कानडखेड येथिल जमीन खरेदी-विक्रीस दुय्यम निबंधकाकडून आडकाठी..?

Spread the love

पालीकेच्या प्रभाव क्षेत्रात नसलेल्या गटांतील जमीनीचे खरेदीखत रोखले; शेतकऱ्यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन;आमरण उपोषणाचा ईशारा

पुर्णा ता.२१(प्रतिनिधी)तालुक्यातील कानडखेड शिवारातील पालीकेच्या प्रभाव क्षेत्रात येणा-या जमीनी व्यतिरिक्त शिवारातील संपूर्ण गाव शिवारातील जमीन दुय्यम निबंधकांनी प्रभाव क्षेत्रात टाकलेले आहे.त्यामुळे मागील ४ ते ५ महीन्यांपासुन शिवारातील शेतकऱ्यांच्या जमीनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.सदरील जमीनीचे खरेदीखत त्वरीत चालु करावेत अश्या मागणीचे निवेदन (ता.२१) रोजी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना देत ३ सप्टेंबर पासुन आमरण उपोषणाचा ईशाराही देऊ केला आहे.

            पुर्णा तालुक्यातील मौजे कानखेड शिवारातील गट नंबर ३० ते ४० वर मागील ४ ते ५ महीन्यापासुन पुर्णा पालीकेने प्रभाव क्षेत्र टाकले आहे. त्यामध्ये गट नं. ३३३ च्या पुढील गट नंबर चा कोणत्याही दराचा उल्लेख नसताना गट नं. ३३३ ते ७५० गटाला कोणताही रेडी रेकनरचा दर नसताना देखील पुर्णा दुय्यम निबंधक कार्यालयाकडून संबंधित शिवारातील शेतकऱ्यांच्या जमीनीचे खरेदी-विक्री थांबवली आहे.त्यामुळे शिवारातील जवळपास १०० ते १५० खरेदीविक्रीचे व्यवहार अडकून पडले आहेत.त्यामुळे शासनाच्या तिजोरीत जाणारा महसुल देखील थांबलेला आहे.याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात संबंधित प्रकरणी वेळोवेळी चौकशी केली.परंतु त्यांना उड्या उडवीची उत्तरे मिळाली दुय्यम निबंधकाच्या मनमानी कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक फटका बसतो आहे.त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी ( ता.२१) रोजी जिल्हाधिकारी संतोषसिंह चव्हाण यांची भेट घेऊन याप्रकरणी निवेदन दाखल केले आहे.

आम्हा शेतकऱ्यांची अडचण दुर करावी, सदरील खरेदीखत ता.२९ सप्टेंबर पर्यंत सुरू न झाल्यास ३ सप्टेंबर पासुन दुय्यम निबंधक कार्यालया समोर  अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन नमुद केले आहे.निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page