दिवाळी व छट सण स्पेशल तिरुपती, छपरा करीता रेल्वेच्या ४६ फे-या

Spread the love

दमरेच्या जालना-छपरा-जालना,तिरुपती-हिसार-तिरुपती एक्सप्रेस गाड्या चालवण्याची घोषणा

पुर्णा ता.२२(प्रतिनिधी)SC Railway Anaunced Special Trainद.म.रेच्या विभागातुन दसरा,दिवाळी आणि छट सणानिमित्त बिहार तसेच हरियाणा, आंध्र प्रदेश राज्यात जाणा-या प्रवाशांची रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने (जालना-छपरा-जालना) विशेष २८ फे-या आणि (तिरुपती-हिसार-तिरुपती) विशेष गाडी १८ फे-या अश्या एकुण ४६ फे-या चालविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.या गाड्या २७ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान धावणार असल्याची माहिती आहे.

नांदेड रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी सदरील गाड्यांबाबत दिलेल्या सविस्तर माहिती नुसार जालना-छपरा विशेष गाडी क्र.(०७६५१) २७ ऑगस्ट ते २६ नोहेंबर २०२५ दरम्यान दर बुधवारी जालना रेल्वे स्थानकावरून रात्रौ ९;३५ वा.सुटुन मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नरसिंगपूर,जबलपूर, कटनी, माणिकपूर, प्रयागराज,बनारस, वाराणसी,सहतवार मार्गे छपरा येथे तिसऱ्या दिवशी स.५;३० 05.30 वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात त्याच मार्गाने हि गाडी क्र.(०७६५२) ता.२९ ऑगस्ट २८ नोहेंबर दरम्यान दर शुक्रवारी छपरा रेल्वे स्थानकावरून रात्री १०;१५ वाजता सुटेल आणि जालना येथे तिसऱ्या दिवशी स.४ वाजता पोहोचेल.या गाडीत २४ डब्बे असणार आहेत.

तिरुपती-हिसार-तिरुपती ही विशेष गाडी ०७७१७/१८ तिरुपती स्थानकावरुन ता.१ ऑक्टोबर ते२६ नोहेंबर दरम्यान दर बुधवारी तिरुपती रेल्वे स्थानकावरून रात्रौ११;४५ वाजता सुटून रेनुगुंटा, गुंटकल, ढोण, काचीगुडा, निझामाबाद, ,नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मार्गाने हिसार येथे चौथ्या दिवशी दुपारी २:०५ वाजता तर परतीच्या प्रवासात ही गाडी ५ ऑक्टोबर ते ३०नोहेंबर दरम्यान दर रविवारी हिसार रेल्वे स्थानकावरून रात्री ११:१५ वाजता सुटेल तिरुपती येथे चौथ्या दिवशी सकाळी ११;३० वाजता पोहोचेल या गाडीस २२ डब्बे असणार आहेत त्यामुळे सणासुदीच्या काळात या विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page