मलकार्जुनअप्पा क्यातमवार यांचे निधन
पुर्णा ता.१(प्रतिनिधी)येथिल एकबालनगर भागातील रहिवासी तथा सेवानिवृत्त पाटबंधारे विभागातील कर्मचारी मालिकार्जुनअप्पा विश्वनाथ अप्पा क्यातमवार यांचे आज (ता.१) सोमवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले आहे.
पुर्णा येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सोमवार रोजी दुपारी २ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली सुना जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते येथिल व्यापारी गजानन क्यातमवार ,सुभाष क्यातमवार यांचे वडील होत.












