भूमीपुत्र पुरस्कार विजेते चेतन सौंदळे यांचा वैद्यनाथ विद्यालयातील वर्गमित्रांकडून सत्कार

Spread the love
परळी वैजनाथ ता.२(प्रतिनिधी):महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकमत तर्फे बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभासंपन्न व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना भूमीपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले माजी नगरसेवक श्री. चेतन सौंदळे यांचा वैद्यनाथ विद्यालयातील शालेय वर्गमित्रांच्या वतीने सत्कार करण्यात आला.हा पुरस्कार राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते चेतन सौंदळे यांना प्रदान करण्यात आला होता.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.सत्कार समारंभास पनवेल महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. भारत राठोड, लातूर जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. गौरीहर स्वामी, पालम तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री. किशोर धिवार,श्री वक्रेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त श्री. प्रकाश खोत, अॅड.दत्तात्र्य आंधळे, एकनाथ सावजी, प्रदीप श्रीनिवार, सुशेन दहीफळे, रमाकांत रेवडकर, उपेंद्र धुमाळ, राजकुमार साठे, नरहरी आसेवार, शैलेन्द्र आरविकर आदींसह मोठ्या संख्येने शालेय वर्गमित्र उपस्थित होते.

You cannot copy content of this page