Purna Railway Station: परिसरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा
अनधिकृत हॉटेलधारक, टपरीवाल्यांना प्रशासनाची झाडाझडती; जेसीबीने बांधकाम जमीनदोस्त
पुर्णा ता.४ (प्रतिनिधी) Administration’s hammer on encroachment पुर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून उभारलेले अवैध हॉटेल व टपऱ्यांच्या अतिक्रमणावर अखेर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली. Purna railway station गुरुवारी (ता.४ सप्टेंबर) सकाळपासून रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल होताच परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी स्वतःहून आपले साहित्य काढून नेले, तर उरलेल्या बांधकामांवर जेसीबी फिरवत प्रशासनाने ते जमीनदोस्त केले.
👉 ठळक बाबी :
- स्टेशन परिसरातील अवैध हॉटेल, टपऱ्यांवर कारवाई
- प्रशासनाची २० जणांची तुकडी घटनास्थळी उपस्थित
- अतिक्रमण जमीनदोस्त; जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर
- प्रवाशांनी सुटकेचा निश्वास; पुन्हा अतिक्रमण होऊ नये, अशी अपेक्षा आहे.
प्रवाशांची कुचंबणा संपणार?
पुर्णा स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील मैदान, तसेच संजय गांधी नगर भागालगत गेल्या काही दिवसांपासून हॉटेलधारक, चहावाले व पानटपरीवाल्यांनी अतिक्रमण करून बस्तान मांडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टपऱ्या व तात्पुरती बांधकामे उभी राहिल्याने प्रवाशांचा मार्ग अरुंद झाला होता. गर्दीच्या वेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. महिलांना व ज्येष्ठ प्रवाशांना यामुळे अधिकच अडचण निर्माण होत असल्याने प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये नाराजी होती.अधिकारी व कर्मचाऱ्यांची तुकडी दाखलही कारवाई पार पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आय.ओ.डब्ल्यू.उदयकुमार,, पी.डब्ल्यू.अरुण कुमार,, स्वच्छता निरीक्षक, रेसुबल प्रमुख यांच्यासह १० ते २० जणांची तुकडी घटनास्थळी उतरवली होती. अतिक्रमणधारकांना तत्पूर्वी आपले साहित्य गोळा करून नेण्यास सूचित करण्यात आले होते. मात्र, काहींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाने पत्रे, ताडपत्री, लाकडी बांधकामे आणि टाकलेला भराव हटवण्यासाठी थेट जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर केला.कारवाईदरम्यान परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक नागरिकांनी या मोहीमेचे स्वागत केले. प्रशासनाने योग्य वेळी योग्य पाऊल उचलले,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
रेल्वेने करुन दाखवले पालीकेचे काय..?
रेल्वे स्टेशन परिसर हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. प्रवासी व नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी ही कारवाई निर्णायक ठरणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, भविष्यात पुन्हा अतिक्रमण उभारले जाणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर देखरेख ठेवावी,तसेच मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर अशीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढल्याने प्रवाशांची गैरसोय कुचंबणा होत आहे.रेल्वे प्रशासना प्रमाणे पालीका प्रशासनानेही नागरिकांच्या हितासाठी अतीक्रमण काढुन मार्ग मोकळा करावा अशी मागणी पुर्णेकरांकडून होत आहे.












