श्री.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील ३१० जणं हद्दपार
परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; ६३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
परभणी, दि. ५ (प्रतिनिधी) :Parbhani Police 310 People Deported News गणेशोत्सव उत्साहात पार पडावा आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या मोहिमेत आतापर्यंत ३१० इसमांना हद्दपार करण्यात आले असून ६३२ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. हद्दपारीच्या आकडेवारीत ताडकळस १७, सोनपेठ ५८, कोतवाली ८, गंगाखेड ६९, चुडावा ८, पाथरी १४, परभणी ग्रामीण १३, मानवत ४०, पिंपळदरी २७, सेलू २७ आणि जिंतूर येथील २१ इसमांचा समावेश आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान Shri Ganeshotsavam कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ही विशेष मोहिम हाती घेतली. या सर्व कारवाया पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि पोलिस अंमलदार ज्योती पांडुरंग चौरे यांनी या मोहिमेत विशेष योगदान दिले.












