Purna पुन्हा खुन..! पत्नीचा पतीने काठीने मारहाण करत गळा दाबून केला निर्घृण खून

Spread the love

पुर्णा तालुक्यातील बलसा येथिल घटना;ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल

पुर्णा ता. ९ (प्रतिनिधी) : Parbhani Purana Tadkalas Police News तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून खुनाच्या घटनांची मालिकाच सुरू असून कायद्याचा धाक कमी होत चालल्याचीच चर्चा नागरिकांत आहे. चुडावा, ताडकळस व पुर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सहा खुनांच्या घटनांची धाकदपट अजून कमी झाली नसतानाच ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतीलBalsa Murder बलसा गावात पुन्हा एकदा निर्घृण खुनाची घटना (ता.८) रोजी घडली आहे.
पुर्णा तालुक्यातील मौजे बलसा येथील देविदास माणिकराव शिंदे (वय ५०) याने किरकोळ कारणावरून आपल्या पत्नीचा जीव घेतला. पत्नीने दुध सांडविल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून देविदास याने ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेत गट क्रमांक ७७ येथे आपली पत्नी सुनिताबाई देविदास शिंदे (वय ४५),हिला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात तिचा गळा आवळून ठार मारले.या घटनेची फिर्याद मयत सुनिताबाई यांचा मुलगा सुरेश देविदास शिंदे (वय २५, व्यवसाय मजुरी, रा. बलसा, मुळगाव बरबडी, ता. पुर्णा) यांनी ताडकळस पोलिसांत दिली. यावरून ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. २३१/२०२५ भा.न्या. संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सपोनि गजानन मोरे यांच्या आदेशावरून पुढील तपासाची सूत्रे पेउपनि काठेवाडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
गेल्या काही दिवसांत चुडावा पोलिस हद्दीतील धनगर टाकळी फाटा व हिवरा (बु), ताडकळस हद्दीतील कळगाव, तसेच पुर्णा पोलीस ठाण्याच्या झिरोफाटा व कोळीवाडा धनगर गल्ली भागात सलग सहा खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यात आता बलसा येथील खुनाची भर पडल्याने तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याची तीव्र भावना नागरिकांत व्यक्त होत आहे

You cannot copy content of this page