Parbhani;संपादक प्रभू दिपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने सन्मानित
छत्रपती संभाजीनगर येथे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मेडीयाच्या अधिवेशनात सन्मान
परभणी,ता.१६(प्रतिनिधी)परभणी येथील लोकमसमिक्षाचे संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दीपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिरात १४ सप्टेंबर रोजी आयोजित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात हा मानाचा सन्मान देण्यात आला.या वेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांच्या हस्ते दीपके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. अधिवेशनात राज्यभरातील अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात भरीव कार्य करीत असलेल्या दीपके यांनी पत्रकार बांधवांच्या समस्यांच्या निवारणा साठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबविले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा सन्मान मिळाल्याने परभणी पत्रकारिता क्षेत्राला अभिमानाचा क्षण लाभल्याची भावना व्यक्त होत आहे.












