पूर्णा-पटणा एक्सप्रेसच्या बुद्ध गया पर्यंतच्या विस्तारासाठी खासदार बंडू जाधवांनी प्रयत्न करावा-भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचं निवेदन

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी) : पूर्णा (जं.) ते पटना (जं.) धावणारी गाडी क्र. १७६१० ही दर गुरुवारी सुटते. ही गाडी पटना (जं.) पासून पुढे गया (जं.) पर्यंत चालवावी तसेच ती आठवड्यातून तीन वेळा सुरू करावी, अशी मागणी भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी परभणीचे खासदार बंडू जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या संदर्भात खासदार बंडू जाधव यांनी चर्चा करून आश्वासन दिले की, “मी स्वतः रेल्वेमंत्र्यांना भेटून ही मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन.”

दि.१९ सप्टेंबर 2025 रोजी ही मागणी अधिकृतरित्या करण्यात आली असून रेल्वे प्रशासनाकडे त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page