मोकाट गाढवांचा उपद्रव; पत्रकार गंभीर जखमी.!

Spread the love

पुर्णेतील प्रशासन झोपेत की गाढवांच्या सावलीत?

पूर्णा ता.२३ (प्रतिनिधी)
पूर्णा शहरातील रस्त्यांवर मोकाट गाढवांचे दहशतवादी राज्य सुरूच आहे. सोमवारी (ता.२३) दुपारी मुख्य बाजारपेठेत पत्रकार अमृत कराळे यांच्यावर मोकाट गाढवांनी अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेने शहरातील नागरिकांचा संताप अनावर झाला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र सवाल उपस्थित होत आहेत.
पुर्णा शहरात गेल्या काही महिन्यांपासून गाढव, गाय, वळू आणि कुत्र्यांनी रस्त्यांवर अक्षरशः मोकाट वचक निर्माण केला आहे. अपघात, जखमी होण्याच्या घटना वाढल्या, वारंवार नागरिकांनी तक्रारी केल्या, प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले तरी प्रशासनाच्या कानावर जणू काही ऐकूच जात नाही.विशेष म्हणजे वाळू उपशासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली गाढवे काम संपल्यानंतर मालक शहरात सोडून देतात. परिणामी रस्त्यांवर सुसाट पळणारी जनावरे अनेक नागरिकांना जीवघेण्या ठोकरा देत आहेत.तर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान करत आहेत.तरीही प्रशासनाने या गाढवांच्या मालकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई केली नाही.

सोमवारी पत्रकार अमृत कराळे यांना समोरून धावत आलेल्या दोन गाढवांनी जोरदार धडक दिली. त्यांच्या शरीराला व पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.शहरातील सामान्य नागरिक आणि पत्रकारसुद्धा मोकाट जनावरांच्या तडाख्यात सापडत असताना प्रशासन नेमके कुठल्या गाढवाच्या सावलीत बसले आहे?

नागरिकांची ठाम मागणी आहे की,

  • मोकाट जनावरे तातडीने शहरातून हद्दपार करावीत.त्यांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.जखमींना योग्य तो नुकसानभरपाई द्यावी.
    प्रशासनाच्या बेफिकीरीला सणसणीत चपराक बसावी, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

You cannot copy content of this page