परळी करांची रेल्वे प्रश्न संदर्भ DRM कडे मागणी
परळी करांची रेल्वे प्रश्न संदर्भ DRM कडे मागणी
परळी, दि. 23 (प्रतिनिधी):
मराठवाड्याच्या हृदयस्थानी व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या परळी वैजनाथ येथे प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा व स्थानकाच्या विकासासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन आज सिंधेवाडी रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. आर. गोपालकृष्ण यांना सादर करण्यात आले.

नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या निवेदनात, परळी वैजनाथ हे अहमदनगर–बीड–परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे टर्मिनस असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भाविक व प्रवासी यांच्या दृष्टीने परळी हे महत्त्वाचे ठिकाण असून, येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –
फिट लाईन्सची वाढ: परळी स्थानकावर अधिक गाड्यांची देखभाल व थांबण्याची व्यवस्था होईल.
आरक्षण काउंटरचे वेळ वाढविणे: विद्यमान 8 तासांऐवजी 12 तास आरक्षण काउंटर सुरु ठेवावे (सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत).
एक्सप्रेस गाड्यांचा विस्तार: मल्लेगाव–विदर एक्सप्रेसचा विस्तार परळी वैजनाथपर्यंत करून प्रवाशांना थेट संपर्क सुविधा उपलब्ध करावी.
परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथील यात्रेसाठी देशभरातून भाविक येतात. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकावरील सुविधा व गाड्यांच्या सोयीसुविधांचा विस्तार होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात ही मागणी केल्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.












