परभणी जिल्ह्यात पूरस्थिती :३६ गावांना पाण्याने वेढले,५७८ नागरिकांचे स्थलांतर; प्रशासनाच्या हालचालींना वेग

Spread the love

परभणी, दि. २३ (प्रतिनिधी) :Parbhani flood Newsजायकवाडी व माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदीत, निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत तसेच पूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परभणी जिल्ह्यातील Godavari, Purna ,Dudhana River गोदावरी, दुधना व पूर्णा या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. वाढत्या पाण्यामुळे नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले असून तब्बल ३६ गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने ५७८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून Parbhani Collector Sanjaysing chouhanजिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

गंगाखेड तालुक्यातील सायाळा, सुनेगाव, म्हैराळ सावंगी, गौंडगाव, चिंच टाकळी, जवळा व रुमणा ही ७ गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत.

मानवत तालुक्यातील धार, वंगलवाडी, कुंभारी, वांगी व टाकळी नि. ही ५ गावे पुरामुळे वेगळ्या पडली आहेत.

पाथरी तालुक्यात मंजरथ, नाथरा, पाटोदा, वडी, कानसूर, लिंबा, आनंदनगर तांडा, मरडसगाव, गौंडगाव, गुंज, उमरा, अंधापुरी, रामपुरी, निवळी अशी १६ गावे संपर्कविहीन झाली असून रामपुरीतील ६० व निवळीतील १० ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव व लासीना ही गावे पाण्याच्या विळख्यात आली आहेत. थडी पिंपळगाव येथील ४०८ नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत तर लासीना गावातील १०० नागरिकांना पुनर्वसित वस्तीतील मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. सेलू तालुक्यातील राजावाडी, कुंडी, सेलू व ढेंगळी पिंपळगाव यांचाही संपर्क तुटला आहे.

पुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने तसेच पुर्णा नदीपात्रात दुधना , येलदरी, सिद्धेश्वर जलाशयातुन पाणी सोडले जात असल्याने पुर्णा नदीकाठच्या पिंपळगाव (बा) गाव शिवारात पाणी घुसले तर गोदावरीचे पाणी सोन्ना शेत शिवारात घुसले आहे.

ढालेगांव बंधाऱ्यातून ३,८१,००० क्युसेक व मुळी बंधाऱ्यातून २,७५,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पुराचे पाणी रात्री उशीरा गंगाखेड व पालम तालुक्यात पोहोचणार असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर लाटे यांनी दिली. जायकवाडी व माजलगाव धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी केला जात असल्याने ढालेगावच्या पाणीपातळीत काही प्रमाणात शिथिलता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

सैन्य दलाच्या तुकड्या सह एनडीआरएफ दाखल Milatary,NDRF पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर येथून मेजर कमाल यांच्या नेतृत्वाखाली व नांदेड येथून प्रशांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली सैन्यदलाच्या २ तुकड्या परभणीत दाखल झाल्या आहेत. त्यासोबतच एसडीआरएफची १ तुकडीही बचावकार्यासाठी दाखल झाली असून या सर्व पथकांना पूरग्रस्त गावांमध्ये तैनात करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२४५२-२२६४०० किंवा टोलफ्री १०७७ तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके (मो. ९९७५०१३७२६, ७०२०८२५६६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अतीवृष्टीमुळे आजपर्यंतची हानी अतिवृष्टी व पुराने १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू, ८६ जनावरांचा बळी आणि ५७३ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली. यातून ४७० घरे पाण्यामुळे बाधित झाली असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page