Beed/Patoda नायगांव घाटात बस-कारचा भीषण अपघात: सरपंचपुत्र ठार,२ गंभीर जखमी

Spread the love

पाटोदा, ता. २४ (प्रतिनिधी) :Patoda Naygav Ghat Accident News पाटोदा तालुक्यातील नायगाव घाट परिसर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघाताने हादरला. घाटातील एका वळणावर समोरासमोर धडकलेल्या रापमच्या बस आणि कारच्या अपघातात थेरला (ता. पाटोदा) येथील सरपंचांचा मुलगा मोनू चंद्रकांत राख (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला. तर विजय सानप (२९)संघर्ष बांगर (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नायगांव घाटातील एका हॉटेलसमोर वळण घेताना रा.प.मची बस आणि कार यांची मंगळवारी (ता.२४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. बस मात्र नियंत्रण सुटून थेट रस्त्याच्या खाली जाऊन अडकली. या भीषण धडकेत कारमधील मोनू राख याचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळावर क्षणात आरडाओरडा माजला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमी विजय सानप व संघर्ष बांगर यांना तातडीने बीड शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगितले.दरम्यान, अपघातामुळे काही काळ नायगाव घाट परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या भीषण अपघातामुळे थेरला गावात शोककळा पसरली आहे.अपघाताच्या भीषणतेचे दृश्य इतके भयानक होते की, पाहणाऱ्यांचे अक्षरशः डोळे पांढरे झाले.


You cannot copy content of this page