Parali;विद्यार्थ्यांच्या प्रयोगातून विज्ञानाचा उत्सव साकार
शारदा विद्या मंदिर माध्यमिक विभागाचा स्तुत्य उपक्रम
परळी वैजनाथ ता.२५ (प्रतिनिधी) –
नाथ शिक्षण संस्था संचलित शारदा विद्या मंदिर माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा आधार घेऊन विविध प्रयोग सादर करून विज्ञानाचा उत्सव साकारला. शाळेच्या विज्ञान विभाग प्रमुख एस. बी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांनी पवनचक्की, विद्युत घंटा, सौरऊर्जा प्रकल्प आदी आकर्षक मॉडेल्स व प्रयोग सादर करून विज्ञानाची ताकद प्रत्यक्ष दाखवून दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, “आपण सुद्धा जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम आहोत,” असा आत्मविश्वास प्रदर्शित केला.
शाळेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयाची आवड निर्माण होऊन त्यांच्या सृजनशीलतेला नवे बळ मिळाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.











