हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; १९ मंडळात पिके पाण्याखाली

Spread the love

हिंगोली ता.२७(प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवार जलमय झाले आहेत. कापणीस आलेले सोयाबीन, कापूस व हळद पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. कळमनुरी तालुक्यातील बोल्डा गावातील नुकत्याच खोलीकरण केलेल्या नाल्याला पुराचा तडाखा बसून नाला फुटला व आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरले.

शनिवारी (ता.२७) सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये वसमत तालुक्यात सर्वाधिक ९९.१ मि.मी. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी २६.५ मि.मी. पाऊस पडला.

तालुकानिहाय पावसाची नोंद (२७ सप्टेंबरपर्यंत):

  • हिंगोली – ६६.३ (९५८.९)
  • कळमनुरी – ६४.७ (११६१.५)
  • वसमत – ९९.१ (१२०३.९)
  • औंढा नागनाथ – ७०.५ (११५२.७)
  • सेनगाव – २६.५ (८६६.१)

जिल्ह्यात १ जून ते २७ सप्टेंबरदरम्यान सरासरी १०६२.८ मि.मी. पाऊस झाला असून, ही टक्केवारी १३६.३% इतकी आहे.


📌 १९ महसूल मंडळांत अतिवृष्टी

  • हिंगोली तालुका – हिंगोली, सिरसम, बासंबा, माळहिवरा (प्रत्येकी ८० मि.मी.), दिग्रस (७१.३ मि.मी.)
  • कळमनुरी तालुका – कळमनुरी (१०३.८), वाकोडी (१०७), डोंगरकडा (७०)
  • वसमत तालुका – वसमत व हयातनगर (१२८.८), आंबा (११२.३), गिरगाव (६७.५), हट्टा (७३), टेंभुर्णी (७८.३), कुरुंदा (१०४.८)
  • औंढा नागनाथ तालुका – औंढा (७७.८), येहळेगाव (७१.३), साळणा (६६.३), जवळा बाजार (६६.५)

अचानक आलेल्या पावसामुळे घरात पाणी घुसून नुकसान, तर नदी-नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.


You cannot copy content of this page