औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू

Spread the love

पूर्णा, ता.३० (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू (ता.३०) सप्टेंबर रोजी पासून सुरु झाली आहे. यासाठी पात्र मतदारांना ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी दिली.पूर्णा तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी निवडणूक विभाग प्रमुख पंढरीनाथ शिंदे व सहायक महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार यांची उपस्थिती होती.

असा असेल मतदार यादीचा कार्यक्रम

  • ३० सप्टेंबर २०२५ जाहीर सूचना प्रसिद्ध,१५ ऑक्टोबरला पहिली पुनर्प्रसिद्धी२५ ऑक्टोबरला दुसरी पुनर्प्रसिद्धी,०६ नोव्हेंबरअर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस,२५ नोव्हेंबर, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध,२५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दावे व हरकती स्वीकारले जातील,३० डिसेंबर अंतिम मतदार यादी प्रसिद्धी होणार आहे.

मतदार होण्यासाठी अटी

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • मतदारसंघात राहणारा असावा.
  • ०१ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्षे पदवीधर असणे आवश्यक.
  • जुन्या मतदारांनाही नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • नमुना अर्ज क्र. १८ (तहसील कार्यालयात उपलब्ध किंवा हस्तलिखित/संगणकावर लिहिलेला मान्य).
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका किंवा शासकीय/नोटरी प्रमाणित पुरावा.
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह).
  • रहिवासी पुरावा – आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, मालमत्ता कर पावती, वीज बिल यापैकी एक.

You cannot copy content of this page