Hingoli;६४ जागांसाठी पोलीस भरतीला सुरूवात

Spread the love
संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जय्यत तयारी

हिंगोली,ता.१०(प्रतिनिधी):

जिल्ह्यात पोलीस दलातील रिक्त असलेल्या ६४ जागाकरीता भरती प्रक्रिया आज बुधवार पासुन प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने पोलीस अधिक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी मैदानावर जावुन पाहणी केली.
११ फेब्रुवारी रोजी पासुन जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर छावण्या उभारण्यात आल्या आहेत. सर्वत्र सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्या प्रमाणे व्हीडीओ चित्रीकरण ही करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. त्यांचे कागदपत्र पडताळणी केले जाणार आहे. प्रत्येक दिवशी ९०० ते १००० उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. इतर जिल्ह्यातुन आलेल्या उमेदवारासाठी नविन पोलीस वसाहतीमध्ये कम्युनिटी हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांना मैदानावर येण्यासाठी पोलीस दलाकडुन वाहनाची व्यवस्था देखिल केली आहे. एकूणच परिस्थितीमध्ये भरतीसाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. १० फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन,अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मिना यांनी मैदानावर जाऊन भरतीपुर्व पाहणी केल्यानंतर काही मार्गदर्शक सुचना केल्या आहेत.

You cannot copy content of this page