अवैध वाळू वाहतुकीवर पुर्णा पोलिसांची कारवाई

Spread the love

तालुक्यातील कान्हेगांव शिवारातील घटना;वाळुसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पूर्णा, ता.२९ (प्रतिनिधी) :

तालुक्यातील कान्हेगाव येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून टिप्परद्वारे चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर पूर्णा पोलिसांनी पहाटे कारवाई करत सुमारे ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अज्ञात टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती आहे.

पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील नदीपात्रामध्ये गुरुवारी २८ रोजी मध्यरात्री विनारॉयल्टी व बेकायदेशीररित्या वाळू काढून टिप्परमधून वाहतूक सुरू असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या.  सहा.पो.नि.श्रीमती रेखा शहारे,पोलीस शिपाई सुधीर काळे,पोलीस शिपाई पुदलवाड व होमगार्ड भुसारे यांचे पथकास मिळाली.पथकाने कान्हेगाव येथील नदीपात्र परिसरात पाहणी केली असता एक टिप्पर वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाळूने भरलेला टिप्पर नदीपात्रातच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांनी घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची केबिन व पिवळ्या रंगाची बॉडी असलेला विनानंबर टिप्पर तसेच अंदाजे दोन ब्रास वाळू असा एकूण ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सुधीर काळे यांच्या फिर्यादीवरून विना नंबरच्या टिप्पर चालक व मालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार प्रकाश इंगोले करीत आहेत.

You cannot copy content of this page