परभणी शहराच्या विकासासाठी खा.बंडु जाधव यांनी खेचुन आणला २० कोटींचा निधी

Spread the love

११० कोटीच्या निधी पैकी पहीला टप्पा मिळाला;नटराज रंगमंदिर, महापालिका इमारतीचे रुप पालटणार; पक्ष सोडल्यानंतर जाधवांचे विरोधकांना विकास निधीने उत्तर

परभणी, दि. २१ (प्रतिनिधी) :

परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ११० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना राज्य शासनाने मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात महापालिकेसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना हिरवा कंदील दिल्याने शहरातील विकासकामांना वेग मिळणार आहे.

या निधीत महापालिका क्षेत्रातील रस्ते, नाल्या, पथदिवे व इतर मूलभूत सुविधांसाठी २० कोटी, नटराज रंगमंदिराच्या नव्या इमारतीसाठी ३० कोटी आणि महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ६० कोटी रुपयांचा समावेश आहे.याशिवाय समांतर पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजनेचे सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून, शहराच्या वाढीव हद्दीचा विचार करून सुमारे २५० कोटींची पाणीपुरवठा योजना व सुमारे ५७४ कोटींच्या भूमिगत गटार योजनेलाही तत्त्वतः मंजुरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

“परभणीचा नियोजनबद्ध विकास हेच माझे ध्येय असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील,” असे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page