परळीत साकारतोय स्व. अजितदादा पवार यांचा पुर्णाकृती पुतळा!
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक;तांत्रिक मान्यता, जागा व प्रशासकीय प्रक्रियेवर सविस्तर चर्चा; येत्या काही महिन्यांत पुतळा उभारणीचे नियोजन
बीड/परळी वैजनाथ | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन म्हणून परळी शहरात बीड जिल्ह्यातील पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. पुतळा उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक मान्यता, प्रशासकीय प्रक्रिया आणि जागा निश्चितीच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.बीड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, सप्तशृंगी दुर्गा उत्सव सेवा संस्थेचे अध्यक्ष, संचालक गौतम आगळे, संस्थेचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.बैठकीत पुतळा उभारणीसाठी प्रस्तावित जागा, आराखडा, तांत्रिक निकष, विविध विभागांच्या आवश्यक मान्यता तसेच प्रशासकीय प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासन स्तरावर या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही महिन्यांत परळी शहरात स्व. अजितदादा पवार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याची आणि लोकहितवादी नेतृत्वाची कायमस्वरूपी आठवण जपणारे हे स्मारक परळीच्या वैभवात भर घालणारे ठरेल. भावी पिढीला प्रेरणा देणारे हे स्मृतिस्थळ उभारण्याचा निर्धार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.वरील फोटो वापरून ठळक अक्षरात सब हेडलाईन्स निळ्या पट्टीवर घेऊन वृत्तपत्र शैलीत बातमीचे कात्रण बनवून द्या











