स्व. सितारामजीअप्पा एकलारे यांचा स्मृतीदिन पुर्णेत  रक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

श्रीगुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयातचा उपक्रम; मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्राचार्य के.राजकुमार

पूर्णा,ता.२२(प्रतिनिधी):

     शहरातील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक,श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष स्व.श्री. सितारामअप्पा बाबारामअप्पा एकलारे यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त येथिल श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात मंगळवारी (ता.२५) रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यानी याप्रसंगी रक्तदान करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांनी केले आहे.

    भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री. गुरु डॉ. नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे,सचिव अमृतराज कदम,सहसचिव.गोविंदराव कदम,कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.याकार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपप्राचार्य डॉ.जितेंद्र पुल्ले,डॉ. प्रकाश भांगे, पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी, उपप्राचार्य एस.टी.शेख, डॉ.रवी बरडे डॉ. संजय दळवी, डॉ. विजय पवार, डॉ. वृषाली आंबटकर, गिरीश शिवणकर, डॉ. राजू शेख, डॉ. दैवशाला कामठाणे तयारी करत आहेत.तरी पूर्णा तालुक्यातील व परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग नोंदवावा असे अहवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.राजकुमार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page