हिंगोलीत पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त

Spread the love

हिंगोली शहर पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी

हिंगोली,ता.२५(प्रतिनिधी)

– महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या साठवणूक करून चोरटी विक्री करणाऱ्यावर हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ७१ हजार ४४० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे.हिंगोली शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न व सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक साहेबराव मस्के यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बावनखोली परिसरात भारत गॅसच्या पाठीमागे असलेल्या एका टिनपत्र्याच्या घरामध्ये आरोपी शेख फरदीन शेख अजीम अहमद रा. बावनखोली ता. जि. हिंगोली याने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूचे पाउच आढळून आले. यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाल्याचे पाउच, प्रिमीयम राजनिवास सुगंधित पान मसाला, आर के पान मसाला, के.एम जाफरानी जर्दा आणि व्ही १ तंबाखूचा समावेश आहे. पोलिसांनी खाकी रंगाच्या ७ मोठ्या पोत्यांमध्ये असलेले पांढऱ्या रंगाचे छोटे पोते जप्त केले असून त्यात एकूण ४ लाख ७१ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे.

छाप्यादरम्यान आरोपीने मुद्देमाल जागीच सोडून पोलिसांना पाहताच पळ काढला. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि आनंद बनसोडे हे करीत आहेत. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकुर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कुमार मस्के, पोलीस हवालदार सुनील अंभोरे,शेख मोहसीन,पोलीस शिपाईदिलीप लेकुळे,गणेश लेकुळे,्बाबासाहेब कांबळे,
आकाश भुतेकर,आकाश इंगोले,महिला पोलीस शिपाई विमल होगे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page