गावपातळीवरील विकासासाठी आ.रत्नाकर गुट्टेंना विजयी करा-श्रुषीकेश सकनुर

Spread the love

ताडकळस – वझुर सर्कलमधील गावांत भाजप- गुट्टे मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रचारात सहभागी

ताडकळस(प्रतिनिधी)
महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,ना.अजित पवार यांच्या माध्यमातून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ताडकळस व वझुर सर्कलमधील अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. पुढील पाच वर्षांत ही विकासाची गंगा गाव पातळीवर आणण्यासाठी महायुती रासपचे उमेदवार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रुषीकेश सकनुर यांनी केले.
वझुर येथे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचारार्थ रविवार १७ नोव्हेंबर रोजी मतदारांशी सकनुर यांनी संवाद साधला. पुढे बोलतांना श्रुषीकेश सकनुर म्हणाले की,आ डॉ रत्नाकर गुट्टे यांनी गत पाच वर्षात सर्व समाजाला न्याय देऊन गाव पातळीवर विकासाची गंगा आणुन कोट्यवधी रुपयांची कामे केली असून दुसर्यांदा आ.गुट्टे यांना विधानसभेत पाठविण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष श्रुषीकेश सकनुर यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही सर्कलमध्ये गावभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
ताडकळस, वझुर सर्कलमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रुषीकेश सकनुर, भाजपचे शहराध्यक्ष मनु पाटील, लिंबाजी भोसले,गुट्टे मित्र मंडळाचे मोरोती मोहिते,सुदाम वाघमारे, गोविंद आवरगंड,पांडुरंग शिंदे, कन्हैया धुळगुंडे, शिवाजी आंबोरे, मारोती पवार, हनुमान मंगनाळे, नागेश माळगे, निलेश पवार,राजु देवकते, भास्कर धोत्रे, रमेश आंबोरे, श्याम दुधाटे, प्रभाकर शिंदे, अवधूत दुधाटे, गजानन गबाळे, गणेश कोरे, निलेश पवार, दिलीप पवार वझूरकर आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत

You cannot copy content of this page