Paraliवैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक लोकनेते गोपीनाथजी मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ
सभासदांच्या हितासाठीच आम्ही कायम कटिबद्ध- विनोद सामत
परळी वैजनाथ ता.२(प्रतिनिधी)सभासदांच्या हितासाठी आम्ही कायम कटिबद्ध असून येथून पुढेही ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन वैद्यनाथ को – ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान चेअरमन विनोद सामत यांनी बँक निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. यावेळी बँकेचे सभासद मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ 2025 च्या निवडणुकीत राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ..धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल स्थापन करण्यात आले असून पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मोंढा विभागातील श्री संकट मोचन हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर सर्व उमेदवारांनी गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रसाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना बँकेचे विद्यमान अध्यक्ष विनोद सामत म्हणाले की वैद्यनाथ बँकेने सर्व सभासदांच्या विश्वासावर आणि सहकार्यावर मोठी प्रगती केली आहे. प्रारंभी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली बँकेने यशोशिखर गाठले आहे तर आता राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने यशाची घोडदौड कायम ठेवली आहे. आगामी काळातही ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगती करीत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सभासदाच्या हितासाठी या निवडणूकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार विद्यमान अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेशराव कराड, विजयकुमार वाकेकर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, माहेश्वर निर्मळे, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री यांच्यासह भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) व मित्र पक्षाचे जेष्ठ नेते विकासराव डुबे, जुगलकिशोर लोहिया, ज्ञानोबा माऊली फड, श्रीराम मुंडे, विजयकुमार मेनकुदळे, पांडुरंग सोनी, वैजनाथ सोळंके, बाजीराव धर्माधिकारी, प्रा. माधुकर आघाव, शांतीलाल जैन, सुरेश टाक, बालाजी (पिंटू) मुंडे, माऊली मुंडे, वसंत निर्मळ, सौ. उमाताई समशेट्टी, महादेव इटके, रविंद्र परदेशी, नितीन ढाकणे, लक्ष्मीकांत कराड, प्रा. दासू वाघमारे, अनिल तांदळे, तानाजी व्हावळे, दत्ताभाऊ सावंत, उमेश खाडे, प्रा. विनोद जगतकर, कुमार व्यवहारे, नितीन कुलकर्णी, नंदकिशोर बियाणी, गरूड, संगमेश्वर फुटके, सौ. देशपांडे, सौ. चंदा ठोंबरे, सौ. वर्षा जोशी, नानासाहेब कवडे, अश्विन मोगरकर, प्रितेश तोतला, अनिश अग्रवाल, प्रशांत कराड, योगेश मेनकुदळे, सुशील हरंगुळे, जगदीश लड्डा, पिंटू वाघमारे, बाळू फुले, अरुण साबू, जगदीश मंत्री, नागनाथ मुंडे, अच्युत जोगदंड, पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.











