Purnaरेल्वेखाली सापडून अनोळखी ईसमाचा मृत्यू..

Spread the love

शहरातील क्रांतीनंतर परिसरातील घटना;पुर्णा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद

पूर्णा ता.३(प्रतिनिधी)(Purna Railway News)धावत्या रेल्वेखाली सापडून एका ४६ वर्षीय अनोळखी ईसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (ता.२) ऑगस्ट रोजी दुपारी शहरातील क्रांतीनंतर परिसरात घडल्याचे उघडकीस आले असून,मयताची ओळख अद्याप पर्यंत पटलेली नसुन, याप्रकरणी पुर्णा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या क्रांती नगर भागातील नांदेड लोहमार्गावरील आऊटर सिग्नलच्या पलीकडे लोहमार्ग मैल कि.मी.अंतर ३२०/१६ ते १८ च्या दरम्यान शनिवारी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास नांदेड येथून पुर्णा रेल्वे स्थानकांवर येत असलेल्या काचिगुडा-नगरसोल गाडी खाली सापडून एका ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती येथिल रेल्वेच्या स्टेशन मास्तरांनी पूर्णा पोलिसांना कळविली.ही माहीती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोहेकाॅ.सुरेश राठोड,लोहमार्ग पोलीस दलाचे सिद्धेश्वर देशमाने, रेसुबलाचे मिना आदीं तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सदरील ईसम हा रेल्वेखाली सापडल्याने त्यांच्या डोक्यात तसेच अंगावर गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असावा तसेच त्याच्या अंगावरील कपडे रेल्वे खाली फरफटत गेल्याने फाटले असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.सदरील ईसमास कोणाला काही माहिती असल्यास पुर्णा पोलीसांना संपर्क साधवा असं आवाहन पोलिसांनी केले आहे.या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात पोहेकाॅ. नळगीरकर यांचे फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,पो.नि.विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page