Parali Vaijanthबालासाहेब फड यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर

Spread the love
परळी वैजनाथ(प्रतिनिधी)येथिल दै.सोमेश्वर साथीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब फड यांना नाशिक येथील'न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र संचलित यांच्या वतीने दिला जाणारा 'वंजारी समाजरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. शहरासह तालुक्यात सर्वच क्षेत्रांतुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नाशिक येथील'न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी राजकीय, सामाजिक, क्षैक्षणीक,धार्मिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.(ता.१०) ऑगस्ट रोजी रविवारी नाशिक येथे पशुसंवर्धन मंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे, मा.मंत्री श्री धनंजयजी मुंडे,मा.खा. डॉ. प्रीतमताई मुंडे ,मा.आ. गोविंद केंद्रे, हभप. डॉ. तुळशीरामजी गुट्टे महाराज, श्री अनिल गर्जे,श्री.कोंडाजी मामा आव्हाड, उद्योजक बुधाची दादा पानसरे, मा.मंत्री खा.भागवतराव कराड, श्री.मोहन दादा घुगे,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हभप. प्रकाश महाराज साठे, हभप.सोपान महाराज शास्त्री आदी मान्यवरांची उपस्थिती आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दै.सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड यांच्या सह अनेकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

You cannot copy content of this page