Purna१७ ऑगस्ट रोजी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन..

Spread the love

विजेत्या संघाला लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके;शिवसेना (शिंदे)गटाचा उपक्रम

पूर्णा ता.६(प्रतिनिधी)गोकुळाष्टमी सणानिमित्त येथिल शिवसेना शिंदे गटाच्या शहर व तालुका शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली (ता.१७) ऑगस्ट रोजी शहरात भव्य दहीहंडी महोत्सवाचे(Purna Shivsena Dahihandi festival)आयोजन करण्यात आले असुन, सुमारे १ लाखांहुन अधीक रोख रक्कमेचे पारितोषिके विजेत्या संघाला देण्यात येणार असल्याची माहिती युवानेते गणेश कदम यांनी दिली आहे. 
 पूर्णा शहरातील जुना मोंढा बाजार मैदानावर शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता.१७) ऑगस्ट रोजी सायं ६ वाजेच्या सुमारास प्रथमच भव्य दहीकाला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून (Ministar Meghana Bordikar Parbhani)जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर,प्रमुख उपस्थिती मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर,आमदार संतोष बांगर,मा.नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम व आनंद भरोसे (महानगरप्रमुख)भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, रामभाऊ कदम आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या महोत्सवात जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या वतीने प्रथम पारितोषीक विजेत्या संघाला ५५ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह,युवा नेते गणेश कदम यांचे कडून व्दितीय पारितोषीक ३१ हाजार रोख व सन्मान चिन्ह तर तृतीय स्थानी असणा-या संघास सचिन उर्फ पप्पू कदम यांच्या वतीने २१ हजार रुपयांचेरोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
भव्य  स्वरुपात आयोजन करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवात जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा यासाठी व्यवस्थापक दिनेश पवार (9049400 620),दत्ता कदम(9595929590), प्रा.बंटी खाकरे (9767141700),शरद कदम(83082 20801), यांच्या कडे नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, युवानेते गणेश कदम व सचिन कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page