Parali Vaijanthव्हीएमडी नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा..

Spread the love
परळी वैजनाथ ता.१६(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्यच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथिल वैजनाथराव मुकुंदराव देशमुख (व्हीएमडी)नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे(Parli Vaijanth VMD Narsing School)आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयाचे संचालक प्रकाश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादनाने झाली. त्यानंतर संस्थेचे संचालक प्रकाश देशमुख यांनी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण केले.(Indipendens Day Celebration) कार्यक्रमानंतर सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका सौ.संध्या दिपकराव देशमुख,कोषाध्यक्ष गणेश देशमुख, अनंतराव देशमुख, बालाजी जगतकर, सतीश सानप,प्रदीप देशमुख,दिनेश देशमुख, संदीप देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रमोद पत्की, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.उत्साहवर्धक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

You cannot copy content of this page