Purnaपालीकेचे पाणी वाटप सुरू;निर्जळी २० दिवसांनी दुर
सणासुदीच्या काळात पुर्णेकरांना मुख्याधीका-यांचा दिलासा
पुर्णा ता.२३(प्रतिनिधी)
मागील २० दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे निर्माण झालेली निर्जळी पालीकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांच्या प्रयत्नामुळे अखेर दूर झाली असून,.आता सणा सुदीच्या काळात पुर्णेकरांना पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पुर्णा शहरात मागील २० दिवसांपासून निर्जळी निर्माण झाली होती. पालीकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पुर्णा नदीवरील जॅकवेल येथिल ७५ एचपीच्या मोटारीत अचानक झालेल्या बिघाडामुळे शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प पडला होता.या बाबत पालीकेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता यांना वारंवार तक्रार करूनही सदरील मोटार दुरुस्ती करीता विलंब होत होता. दरम्यान निर्जळी निर्माण झाल्याने प्रसिद्धी माध्यमांनी यावर लक्ष अधोरेखित केल्या नंतर मुख्याधिकारी उत्कर्ष गुठ्ठे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी राजु सोनुले यांना सोबत घेऊन, कटाक्षाने लक्ष देत संबंधित यंत्रणेकडून तातडीने मोटार दुरुस्ती करवून घेतली. दुरुस्त मोटारीचे साहीत्य जमा झाले.परंतु अचानक कोसळलेल्या अतीवृषीच्या पावसाने पुर्णा नदीला पूर आला होता. यामुळे जॅकवेल वर पोहचने कठीण झाले होते.नदीच्या पाण्याची पातळी काही अंशी उतरताच (ता.२२) रोजी क्रेनच्या साह्याने मोटारीचे अवघड साहीत्य पोहचवले. सदरील भागात विद्युत पुरवठ्याची अडचण देखील त्यांनी जातीने लक्ष घालून सोडवली.अखेर (ता.२२) रोजी मध्यरात्री पाणीपुरवठा सुरू झाला.शनिवारी शहरातील आनंदनगर , आदर्श काॅलनी, चिटणीस काॅलनी,कमाल टाॅकीज आदीं भागात पाणी वाटप करण्यात आले. मुख्याधीका-यांनी उशिरा का होईना पण दाखवलेल्या तत्परमुळे सणासुदीच्या काळात निर्जळी दुर झाली आहे.या कामांमुळे पुर्णेकरांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
ठिसाळ यंत्रणेला शिस्त लावण्याची गरज
पाणीपुरवठा विभागातील अभियंता व कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका पाणीपुरवठा योजनेला बसत आहे. यामुळे पालीका प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे.आता मुख्याधीका-यांनी यात लक्ष घालून ढासळलेल्या पाणी पुरवठा यंत्रणेला शिस्त लावावी तसेच एक शिल्लक असलेल्या मोटारींची दुरुस्ती देखील स्वतःच्या निगराणी खाली करून घेण्याची गरज आहे.












