परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी तडकाफडकी निलंबित
परभणी १३ आॅगस्ट/प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी झालेल्या गर्भवती माता आणि तिच्या पोटातील बाळाच्या मृत्यू प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य शासनाने तात्काळ निलंबित केले आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांना प्रशासकीय व वित्तीय अनियमिता प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबत गुरूवारी(दि. १३) दोन स्वतंत्र आदेश जारी केले आहेत.परभणी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील दोन्ही बड्या अधिकाऱ्यांचे एकाच वेळी निलंबन झाल्याने खळबळ उडाली आहे.











