Parli इराणी बस्तीत डीवायएसपी ऋषिकेश शिंदेंच्या पथकाचा छापा; तब्बल ४० किलो गांजा जप्त..!

Spread the love
परळी ता.२ सप्टेंबर (प्रतिनिधी)/parli-Sambhajinagar Police Station News परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी गल्ली येथील एका घरावर अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी DYSP Rushikesh Shinde(डीवायएसपी) ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ४० किलो गांजा जप्त केला असून, मुद्देमालाचा आकडा वाढवु शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
परळी शहरातील इराणी बस्तीत एका घरात मोठ्या प्रमाणात गांज्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी शिंदे व स्थानिक पोलीस दलाने आज दुपारी छापा टाकला. या कारवाईदरम्यान गांज्याची मोजणी सुरू असून आतापर्यंत ४० किलोचा साठा हाती आला आहे. अजूनही मोजणी सुरू असून, एकूण जप्तीचा आकडा शंभर किलोच्या घरात जाण्याची शक्यता आहे.या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे. परळी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याने गांज्याचे रॅकेट सक्रिय होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक होणार का व पुढील चौकशीत अजून कोणते धागेदोरे समोर येतात का.? याकडे परळी सह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या वृत्तामुळे परळी शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

You cannot copy content of this page