राज्यस्तरीय अधिवेशनास परभणीतुन शेकडो पत्रकार सहभागी होणार-सुरेश नाईकवाडे
परभणी,ता.७(प्रतिनिधी): डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी परभणी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक पत्रकार सहभागी होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी सांगितले.
परभणीत प्रा.सुरेश नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे होऊ घातलेल्या ता.१४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या डिजिटल मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हा निर्धार करण्यात आला.बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके प्रमुख अतिथी होते. जिल्हा व महानगर परिषदेचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. अधिवेशनात सर्व डिजिटल मीडिया पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस प्रा.नाईकवाडे यांनी केले. यावेळी उपस्थित पत्रकारांना डिजिटल मीडिया परिषदेची ओळखपत्रे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक परभणी महानगर अध्यक्ष राहुल वहिवाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष अमर गालफाडे यांनी मानले. या बैठकीस परभणीतील डिजिटल मीडियाचे मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.












