राज्यराणी एक्सप्रेसमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास!

Spread the love

रेल्वेत चोरट्यांचा दबदबा –रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस नामशेष.!

परभणी ता.१८ (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई ते नांदेड या मार्गावरील राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम मिळून तब्बल 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. परभणी स्थानकावर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अक्षयकुमार आठवले हे आईसोबत प्रवास करत असताना गाडी परभणी स्थानकात येण्याच्या सुमारास आईजवळील पर्सच गायब झाली. पर्समध्ये सोन्याचे दागिणे आणि रोकड – असा मिळून लाखोंचा मुद्देमाल होता. या प्रकरणी त्यांनी लोहमार्ग पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

⚠️ प्रवाशांचा रोष : “RPF आणि GRP झोपेत आहेत का?”

  • परभणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मेल, एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
  • परभणी येथे रेल्वे सुरक्षा बल (RPF)लोहमार्ग पोलीस (GRP) यांचे ठाणे असले तरी, कर्मचारी अपुरे असल्याचे कारण देऊन सुरक्षा व्यवस्थेकडे ढिम्म दुर्लक्ष केले जाते.
  • दरम्यान, प्रवासी मात्र लाखोंचा तोटा सहन करत असताना पोलिस व सुरक्षा दल “कारवाई सुरू आहे” या जुजबी आश्वासनावर थांबले आहेत.

प्रशासनावर होतोय थेट आरोप..!

  • “रेल्वे सुरक्षा दल फक्त गणवेश दाखवण्यासाठी आहे का?”
  • “लोहमार्ग पोलिस फक्त गुन्हे दाखल करून मोकळे होत आहेत; आरोपी मात्र अदृश्य!”
  • “प्रवाशांची सुरक्षितता ही रेल्वे प्रशासनासाठी केवळ घोषणाबाजी ठरली आहे.”

You cannot copy content of this page