🛑 परभणीत सैन्य दल दाखल होणार.! एनडीआरएफची टीमही तातडीने दाखल होण्याची शक्यता 🛑
ढालेगांव,दुधना, येलदरी, सिद्धेश्वर प्रक्लपातुन लाखों लिटर पाण्याचा विसर्ग;जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत; गावोगावी भीषण पुरस्थितीची शक्यता.
परभणी, दि.२३ (प्रतिनिधी) NDRF team is also likely to enter immediately newsजायकवाडी, माजलगाव, निम्न दुधना आणि पूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने परभणी जिल्ह्यासह बीड व नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, दुधना व पूर्णा या प्रमुख नद्यां धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने नदीकाठच्या शेकडो गावांना संभाव्य पुराचा मोठा धोका लक्षात घेऊन Army forces will enter Parbhani.जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाची तुकडी बोलावली असून, ती काही तासांतच पाथरी उपविभागात दाखल होणार आहे. यासोबतच जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी राज्य शासनाकडे एनडीआरएफच्या टीमची मागणी केली असून, तीही लवकरच परभणीत दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गुंज
🔻 गोदावरी नदीचा रौद्रावतार
पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंज गावास गोदावरी नदीच्या पाण्याने वेढा घातला असून, येथील दत्त मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी पोहोचले आहे. समर्थ चिंतामणी महाराज उद्यान पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. पाणी तासागणिक वाढत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सेलु तालुक्यातील सोन्ना गावाला पाण्याचा वेढा पडला आहे.

• पुर्णा तालुक्यातील गोदावरी नदीवरील धानोरा काळे पुल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्यामुळे पालम -ताडकळस रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

🔻 प्रकल्पांमधून प्रचंड विसर्ग
- माजलगाव धरणातून सुमारे १ लाख क्युसेस विसर्ग
- मंगरुळ उच्च पातळी बंधाऱ्यातून १.७० लाख क्युसेस विसर्ग
- निम्न दुधना प्रकल्पातून ३१,९०४ क्युसेस विसर्ग
- येलदरी, दुधना प्रकल्पातून आज रात्री ५१,१०० क्युसेस विसर्ग अपेक्षित
या सर्वांचा मिळून सुमारे ३ लाख क्युसेसपेक्षा अधिक पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले जात असून, हे प्रमाण दर तासाला आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुर्णा नदी धोक्याच्या पातळीवर.. तालुक्यातुन वाहणाऱ्या पुर्णा नदीपात्रात दुधना व येलदरी प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यातच लाभक्षेत्रात सोमवारी पुन्हा एकदा अतिवृष्टीचा पाऊस झाला परिणामी पुर्णा नदी धोकादायक पातळीवर वाहत आहे.तालुक्यातील कंठेश्वर येथे गोदावरी व पुर्णा नद्यांच्या संगम होतो.गोदावरी पात्रात अडीच ते तीन लाख क्युसेस पाणी सोडले जात असल्याने पुर्णा नदीचे पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सहजतेने जात नसल्याने तासागणीक नदीची पातळी वाढत आहे.
🔻 भीषण परिणाम जिल्ह्यातील अनेक लहान मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत, नदीकाठच्या अनेक गावांत सखल भागात नद्यांचे पाणी घुसले असुन, काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. ओढे, नाले, लघु-मध्यम प्रकल्पही तुडुंब भरले असून त्यांचे पाणी नद्यांमध्ये मिसळत आहे. नदीकाठावरील ग्रामस्थांनी तातडीने सतर्क राहावे, स्थलांतर करावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
🌧️ सततचा मुसळधार पाऊस, प्रचंड विसर्ग आणि वाढती पाण्याची आवक यामुळे परभणी जिल्हा भीषण पुरसंकटाकडे वाटचाल करीत असून, प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले असल्याचे दिसून येत आहे.












