Purna;महादेव मंदिर संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायणास शनिवार पासून प्रारंभ
पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) : शहरातील महादेव मंदिर संस्थान येथे शनिवार, (ता.११) ऑक्टोबर २०२५ पासून शुक्रवार, (ता. १७) ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह“श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा “ उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याचे पारायणाचे नेत्तुत्व ह.भ.प. श्री.नारायण महाराज टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.दररोज सकाळी व संध्याकाळी भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ८ ते ११ या वेळेत प्रसिद्ध किर्तनकार संतप्रवचन करतील.या सात दिवसांच्या पारायणात पुढील मान्यवर किर्तनकार आपले अमृतमय विचार मांडणार आहेत :
- ह.भ.प. काशिनाथ महाराज माने (फुळकळकर)
- ह.भ.प. रामकृष्ण महाराज (लोहगावकर)
- ह.भ.प. आकाश महाराज मस्के (जामखेड)
- ह.भ.प. भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज (पूर्णेकर)
- ह.भ.प. रोहिदास महाराज मस्के (बामणी, ता. गंगाखेड)
- ह.भ.प. अविनाश महाराज वाघ (भानेर, जि. जळगाव)
- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (जवळेकर)
तसेच भागवत कथा वाचन दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुप्रसिद्ध कथा वाचक ह.भ.प. अविनाश महाराज वाघ (भानेर) यांच्या द्वारे होईल.सोहळ्याचा समारोप शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ (अ.कृ. द्वादशी) रोजी करण्यात येईल. या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत श्रींची पालखी मिरवणूक निघणार असून, त्यानंतर ११ ते १ वाजेपर्यंत ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले आहे.कार्यक्रमानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
संपूर्ण आठवडाभर पारायण, कथा व किर्तनांमुळे महादेव मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून जाणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.












