महाराष्ट्र कास्टट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद कुरेवाड

Spread the love

परभणी ता.१६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद परभणी येथील मुख्य लिपीक श्री प्रल्हाद विश्वनाथराव कुरेवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर शिक्षणाधिकारी योजना कार्यालय तसेच परभणी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मा. शिक्षणाधिकारी योजना श्री तेजराव काळे, अधीक्षक भ.नि.नि. पथक प्राथमिक श्री बाळासाहेब मुंढे, श्री एस. पी. दिवेकर, श्रीमती वंदना गायकवाड आदी मान्यवरांसह सहकर्मी व मित्रपरिवार यांनी श्री कुरेवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, श्री प्रल्हाद कुरेवाड हे प्रामाणिक, कार्यतत्पर व सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण वागणारे अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ निश्चितच अधिक बळकट होईल.श्री कुरेवाड यांनीही यावेळी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत म्हटले की, “महासंघाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा माझा संकल्प आहे. संघटनेचे बळ हे एकजुटीत आहे, आणि तीच माझी ताकद असेल.”या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्थांकडून तसेच कर्मचारी संघटनांकडून श्री कुरेवाड यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

You cannot copy content of this page