Parbhani ;सेलु शहरात घरफोडी करणारा चोरटा जेरबंद
भरदिवसा घरफोडीचा पाच दिवसांत लावला छडा; एका आरोपीसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त;स्था.गु.शाखा व सेलु पोलीसांनी कामगिरी
परभणी, ता. १५ (प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील सेलू शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पाच दिवसांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलिसांनी संयुक्त कारवाईत एका आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्रीनगर येथे दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी अज्ञात इसमाने घर फोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३०३ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रविद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरेश गुजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलीसांनी तांत्रिक तपास, घटनास्थळावरील पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती दिली.
तपासादरम्यान आरोपीची अंगकाठी व गुन्हा करण्याची पद्धत याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यानुसार रविद्रसिंग रणजितसिंग टाक (वय २२, रा. आठवडी बाजार, मानवत, ता. मानवत, जि. परभणी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीकडून चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या (त्यापैकी एक तुटलेल्या अवस्थेत), सुमारे एक तोळा वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, लहान मुलांच्या कानातील सुमारे पाच ग्रॅम वजनाचे दोन जोड दागिने तसेच ५०० व २०० रुपयांच्या नोटांसह ४० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रविद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरेश गुजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक दिपक बोरसे (सेलू पोलीस स्टेशन), सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सुग्रीव केद्रे, पोलीस हवालदार निलेश भुजबळ, विलास सातपुते, पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, सुलक्षण शिंदे, गणेश कौठकर, इंद्रजीत बावरी, नरहरी उंबरवाड, मोहन लाड, ज्ञानेश्वर निळे, महिला पोलीस हवालदार अनिता राठोड, जयश्री आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर ढवळे, परसराम गायकवाड, आनंद पांचाळ तसेच सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेख, राऊत, पोलीस हवालदार शेख, पोलीस कॉन्स्टेबल बारवकर व डुबे यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.











