७ कर्मचारी सस्पेंड;जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा भोवला.!

Spread the love

परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीसांत गुन्हा दाखल

परभणी/प्रतिनिधी
राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचे उल्लंघन करणे ७ कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. जनगणना पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नियुक्ती होऊनही कर्तव्यावर हजर न राहिल्याबद्दल सातही जणांविरुद्ध नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपाच्या जनगणनाचे प्रभारी अधिकारी सय्यद आवेज हाश्मी यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी ७ कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून अधिकृत नियुक्ती केली होती. त्यांना जनगणनाकामी तात्काळ हजर राहण्याचे आदेश मनपा प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, २५ एप्रिल ते ३ जून या कालावधीत आदेश देऊनही कर्तव्यावर हजर न झाल्याने मोहम्मद सनाउल्लाखान समिउल्ला खान (फातेमा हायस्कुल, रहमतनगर, परभणी), प्रभाकर वसंतराव भोंडवे (मातोश्री धोंड्याबाई प्रायमरी स्कूल, लोणी, ता. पाथरी), प्रशांत प्रल्हादराव रेंगे (नुतन प्राथमिक शिक्षणालय, परभणी), अनंत किशनराव किरडे (श्री छत्रपती शाहू प्रायमरी स्कूल, परसावतनगर, परभणी), जब्बार अली खान रफतअली खान (अल करीम हायस्कुल, मदिनानगर, परभणी), गोविंद रामकिशन रोडे (कै. हरिबाई वरपुडकर ज्युनिएर कॉलेज, पेडगाव, परभणी), लोहट सचिन मुरलीधर (मांडव्यऋषी विद्यालय, मांडाखळी) आदींविरूद्ध नवामोंढा पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम २२३, ३२ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                                  

You cannot copy content of this page