पुर्णेचे डि.वाय.एस.पी डॉ.समाधान पाटील यांची गडचिरोली येथे बदली

Spread the love

कुंदनकुमार वाघमारे नवे उपविभागीय पोलिस अधिकारी

पुर्णा,ता.२४(प्रतिनिधी)

पालम-पुर्णा उपविभागाचे पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांची प्रशासकीय कारणांहुन गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा उपविभागात बदली करण्यात आली असून,त्यांच्या जागी हिंगोली शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे.

पुर्णा-पालम उपविभागात मागील दोन वर्षांपासून डॉ.समाधान पाटील हे उपविभागीय पोलिस अधिकारी पदी कार्यरत होते.अत्यंत मनमिळाऊ स्वभाव व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते.त्यांच्या काळात जातीय सलोखा, सार्वजनिक मिरवणुक,स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका सुयोग्य नियोजनाखाली पार पडल्या.त्यांनी खुन,दरोडा,चोरी, अत्याचार,अश्या किचकट गुन्ह्याचा निकाल लावला होता.तरुण तडफदार असलेल्या डॉ.पाटील यांनी आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण केल्या नंतर त्यांची प्रशासकीय कारणांहुन गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा उपविभागात बदली करण्यात आली असल्याची माहिती आहे.

पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक ते उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून ख्याती असलेले कुंदन कुमार वाघमारे यांना पुर्णा-पालम उपविभागाचा पदभार देण्यात आला आल्याची खात्रीलायक माहिती आहे.कुंदनकुमार वाघमारे यांची पोलीस खात्यातील कर्तव्यकठोर अधीकारी म्हणून ख्याती आहे.त्यांनी शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तसेच हिंगोली शहराची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.आता पुर्णा विभागात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय उपाययोजना करतात याकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page