पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करावी- तहसीलदार माधवराव बोथीकर यांचे आवाहन
पुर्णा /प्रतिनिधी
5 वर्षा खालिल सर्व बालकांना पोलिओ डोस देऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करावी. असे आवाहन पुर्णेचे तहसीलदार मा. माधवराव बोथीकर यांनी केले.
पुर्णा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने मंगळवारी,ता.२३ जून रोजी तहसील कार्यालय पुर्णा येथेतहसीलदार मा. माधवराव बोथीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कार्यबल समितीची बैठक संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.बैठकीस पुर्णा पं.स. सभापती श्रीमती उज्वला पिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ.लक्ष्मण नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना त्यांनी सर्व विभागांनी समन्वय साधुन मोठ्या प्रमाणावर मोहिमेची जनजागृती करावी व तालुक्यातील ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट साध्य करावे अशा सुचना दिल्या.बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शासन निर्देशानुसार २८ जून २०२६ रोजी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ५ते५ वर्षे वयोगटातील पुर्णा तालुक्याअंतर्गत ग्रामीण १० हजार ९८८व शहरी ५ हजार ३६९अशी एकुण समुारे १६ हजार ३५७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे अपेक्षीत लाभार्थी उदिष्टय आहे. यासाठी ग्रामीण १२८ व शहरी २७ एकुण १५५ पोलिओ लसीकरण बुथ स्थापन करण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच आठवडी बाजार, रेल्वेस्टेशन, बसस्टॅड, विटभट्या इ. ठिकाणी तालुक्यामध्ये मोबाईल टिम व ट्रांझीस्ट टिम च्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे.याची पुर्व तयारी झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विद्यासागर पाटील व वैद्यकिय अधिक्षक डॉ.लक्ष्मण नाईक यांनी दिली.
बैठकीस आरोग्य, शिक्षण, बालविकास आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. बैठक यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.











