पूर्णा येथे शिवसेनेची BLA-2 झूम मार्गदर्शन मिटींग संपन्न
शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचे मार्गदर्शन
पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील BLA-2 पदाधिकाऱ्यांची झूम मार्गदर्शन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत बूथस्तरावरील नियोजन, मतदार संपर्क मोहीम तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

पूर्णा जुनामोंढा बाजार येथील राम मंदिर परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रविवारी (ता.२८) रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील BLA-2 बैठकीचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ कदम, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.यावेळी विशाल कदम यांच्यासह गंगाखेड तालुकाप्रमुख शहुराव मुंढे, गंगाखेड शहरप्रमुख अंगद बांगल, पालम तालुकाप्रमुख अनिल देशमुख, पालम शहरप्रमुख कल्याण सिरस्कार, पूर्णा तालुकाप्रमुख व्यंकटराव पौळ, जिल्हा परिषद सदस्य राजेशजी फड, मुंजाभाऊ कुक्कर,संजय जल्हारे, पूर्णा पंचायत समितीचे उपसभापती काशीनाथ काळबांडे, विशाल भोसले, युवासेना गंगाखेड शहरप्रमुख रजत गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख गजानन सवराते, अंकित कदम, लक्ष्मण कदम, रामजी भालेराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील नियुक्त BLA-2 पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्रनिहाय नियोजन, मतदार यादीतील त्रुटी दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी, बूथ व्यवस्थापन तसेच निवडणुकीदरम्यान BLA-2 पदाधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बूथवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी वक्त्यांनी शिवसेनेची भूमिका व पक्षाच्या धोरणांची माहिती देत आगामी निवडणुकांमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत आपली मते मांडत विविध सूचनाही केल्या.संपूर्ण बैठक उत्साही वातावरणात पार पडली असून उपस्थित शिवसैनिकांमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.











