गंगाखेडमध्ये धनगर समाजाचा विराट मोर्चा

Spread the love

महेश बीडगर प्रकरणी सखोल चौकशी मागणी

परभणी/प्रतिनिधी
गंगाखेड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातून महेश बीडगर मारहान प्रकरणी शनिवारी(दि. १२) सकल धनगर समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात धनगर समाजाचे विविध समाजातील हजारो आंदोलन उपस्थित होते.

आंदोलनात माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे,भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, विठ्ठलराव रबदडे, दीपक बोराडे, गणेशराव हाके, शशिकांत वडकुते, एड. मिथिलेश केंद्रे, श्रीकांत भोसले, मारोतराव बनसोडे, धम्मानंद घोबाळे, जितेश गोरे, प्रणित खजे आदींसह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. महेश बिडकर यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका आंदोलनातील व्हायरल व्हिडिओच्या आधारे मागील मंगळवार (दि. ७) गंगाखेड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मारहाण झाली होती. तसेच या प्रकरणी गंगाखेड पोलिसांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निषेध म्हणून शनिवारी सकल धनगर समाजाच्या वतीने गंगाखेड शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात, महेश बिडगर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, घटनेची सखोल चौकशी करावी, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, घटनेच्या स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ तसेच प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवावे, घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित सर्व आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

                                   

You cannot copy content of this page