परभणीत एकाच रस्त्यावर दोन अपघात; एक जखमी, कारचे नुकसान

Spread the love

रेल्वे स्टेशन व शिवाजी महाराज पुतळा परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत

परभणी, दि. २१ (प्रतिनिधी) :

शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंगळवारी दुपारी दोन वेगवेगळे अपघात घडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. एका अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या अपघातात कारचे नुकसान झाले.

रेल्वे स्टेशनसमोर रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीस एमएच-०४ जेके-७४६३ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात संबंधिताच्या पायाला गंभीर दुखापत झाली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश बनाटे व सहकाऱ्यांनी तातडीने जखमीला रुग्णालयात दाखल करून वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, काही अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एमएच-४४ एजे-९९९० क्रमांकाच्या हायवाने एका कारला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक सिद्दिकी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वाहतूक नियंत्रणात आणली.

You cannot copy content of this page