रेल्वेत बिना तिकीट प्रवास करणाऱ्या ३३९ जणांना पकडले

Spread the love

नांदेड रेल्वे विभागाची मोहीम २.३३ हजार दंड वसूल

पूर्णा/ प्रतिनिधी

नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने धावत्या रेल्वेत विना तिकीट व अनियमित प्रवास प्रवास करणाऱ्या 339 जनाविरुद्ध प्रशासनाच्या पथकाने धडक मोहीम राबवून सुमारे दोन लाख तेहतीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या मनमाड अकोला परळी मुदखेड मार्गावरील धावत्या सुपरफास्ट एक्सप्रेस सवारी गाडीमध्ये रेल्वेच्या वाणिज्य विभागांतर्गत दिनांक 31 जुलै रोजी दिवसभरात विभागीय व्यवस्थापक प्रदीप कांबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध 28 जणांच्या पथकाने एक विशेष मोहीम हाती घेतली होती धावत्या गाड्यातून विना तिकीट व आरक्षित डब्यात व अनियमित प्रवास तसेच प्रवासी साहित्य घेऊन जाणाऱ्या तब्बल 339 जणांना रेल्वेच्या भरारी पथकाने तब्येत घेतले आहे सदरील प्रवाशांकडून सुमारे दोन लाख 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविली आहे
धावत्या रेल्वेमध्ये प्रवास करताना वैद तिकीट योग्य प्रवास प्राधिकरणासह प्रवास करावा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महसूल संरक्षणासाठी रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये विशेष टिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते यापुढेही अशा पद्धतीची मोहीम चालूच राहणार आहे त्यामुळे प्रवाशांनी खबरदारी घेऊन वैद्य टिकिटानुसार प्रवास करावा
शैलेश कुमार सिंह
सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक नांदेड रेल्वे विभाग

You cannot copy content of this page