विधानपरिषदेत पोलीसांतुन ७ आमदार करा;हिंगोलीत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचे धरणे
हिंगोली,ता.२६(प्रतिनिधी );
पोलिसांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदाराप्रमाणे (Police MLA Protest)सेवानिवृत्त पोलिसांचे ७ आमदार विधान परिषदेत निर्माण व्हावेत यासाठी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अमलदारांनी २५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले.या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलिस अमलदार, बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था हिंगोली यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमुद केले की, शिस्तीच्या नावाखाली काही वरिष्ठ अधिकार्याकडून अमलदारावर होणारा अन्याय दुर करावा व अन्याय करणार्या अधिकार्यावर कार्यवाही करावी, पोलिसांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदारा प्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांचे पण ७ आमदार विधान परिषदेत निर्माण व्हावे.
यासाठी १२१ आमदारांनाचा लेखी पाठींबा मिळूनही विधीमंडळात हा ठराव शासनाने मांडला नाही. त्यामुळे हा मुद्दा निकाली काढावा यासह इतर मागण्यांचा उल्लेख निवेदनात नमुद करण्यात आला आहे. निवेदनावर किशन राठोड, शेषराव चव्हाण, जमिरोद्दीन शेख, गंगाराम इंगोले, सुभाष सोळंके, प्रकाश गिरे, शेषराव राठोड, शंकर देवकर, सारगो अण्णा, कमरोद्दीन, विठ्ठल भडंगे, प्रकाश अवचार, बेग, कसबे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.











