Farmer susaid; असोला येथील शेतक-याने लावला गळफास
ताडकळस/प्रतिनिधी
असोला येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ७) उघडकीस आली.परभणी तालुक्यातील असोला येथील विश्वनाथ शिवरामजी जावळे (वय ७८)असे मयत शेतक-याचे नांव आहे. यावर्षी पाउस पडत नाही व सोयाबीनचे हाती आलेले पिक करपून गेले आहे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असलेले कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेत सोमवारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने अंगणातील बदामीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मयत शेतक-याचे पुतणे अवधूत जनार्दन जावळे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीसांत नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांचे सहायक पोलिस निरिक्षक शिंदे, उपनिरीक्षक अर्जुन रणखांब पवार, आप्पाराव व-हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय परभणी येथे पाठविला.या गुन्ह्याचा तपास ठाणेदार श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनात आप्पाराव व-हाडे हे पुढील तपास करीत आहेत.










