नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन-जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

Spread the love

नांदेड/प्रतिनिधी

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा कहर चिंतेचा विषय बनत चालला आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होतं आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधासह 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते असुन सकाळी 7 ते 10 या वेळेत भाजीपाला खरेदी व विक्री ची परवानगी देण्यात आली.

कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केलं आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली.

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती, असेही आवाहन चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page