गळफास घेतलेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
पुर्णेतील सिद्धार्थनगर भागातील भाग्यश्री खरात यांचा दुर्दैवी अंत; रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी) : शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या भाग्यश्री राहुल खरात (वय ४०) यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून मंगळवारी (ता. २९) सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून. यानंतर मयताचे कुटुंबीयांनी निदर्शनास येताच त्यांनी तातडीने भाग्यश्री खरात यांना खाली उतरवून गंभीर अवस्थेत उपचारासाठी पूर्णा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगर भागातील खरात कुटुंबातील भाग्यश्री खरात यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पूर्णा पोलिस जमादार राहुल मोरे, आनंद सोनकांबळे व एकनाथ आळशे यांनी घटनास्थळासह ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, भाग्यश्री खरात यांनी नेमक्या कोणत्या कारणातून गळफास घेण्याचा प्रयत्न केला, याची माहिती सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेमुळे सिद्धार्थनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेमागील कारणांचा तपास जमादार राहुल मोरे,हे करत आहेत.










