जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त पुर्णेत भव्य रक्तदान शिबिर..
पूर्णा ता. (प्रतिनिधी) : जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र दिवसाच्या निमित्ताने खिदमत फाउंडेशन व ईद-ए-मिलादुन्नबी, जामा मस्जिद कमिटी पूर्णा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबिर शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी जामा मस्जिद, पूर्णा येथे सकाळी १०.०० वाजल्यापासून संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.या रक्तदान शिबिरातून अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार असून, ईद-ए-मिलादुन्नबीच्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळणार आहे. समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच यावेळी हिजामा कॅम्पचे आयोजनही १७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात येणार असून, त्यासाठीही इच्छुकांनी नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.












