Police Red;पानटपरीतुन प्रतिबंधित गुटखा जप्त
पुर्णा पोलीसांत विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
पूर्णा, दि. १६ (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत असलेल्या एका पानटपरीवर छापा टाकून पूर्णा पोलिसांनी विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त केल्याची घटना गुरुवारी,ता.१६ रोजी घडली आहे.या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बसस्थानकाडे जाणाऱ्या रोडवरील नवा मोंढा परिसरातील एका पानटपरीवर गुरुवारी सायंकाळी सुमारे ४ ही वाजता कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान टपरीत विक्रीसाठी ठेवलेला राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा १००० गुटखा, विमल पान मसाला, प्रीमियम झाफरानी जर्दा तसेच आदी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करत मुद्देमालासह पानटपरी चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले असून, पुर्णा पोलीस ठाण्यात पो.शि.सुरेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणीक कदम यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास प्रभारी ठाणेदार सपोनि सिंगणवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अजय किरकन हे करत आहेत.









